Pune: पुण्यातील (Pune) शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. महाराष्ट्र सरकारच्या वतीने शिवसृष्टीला आम्ही ५० कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. “मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री,आम्ही तिघे मावळेच आहोत.एकनाथ शिंदे महाराजांना खूप मानतात आणि अजित दादा हे पुण्याचे काही काम असेल तर नाही म्हणतच नाहीत”, असं देवेंद्र फडणीस म्हणाले.