केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सूरज चव्हाणची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या चित्रपटात इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. २५ एप्रिलला ‘झापुक झुपूक’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने चित्रपटाची टीमने लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला उपस्थित राहून संवाद साधला.