मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे हे एकत्र येणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत यासंदर्भात विधान केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेला आणखी हवा मिळाली. मात्र, सध्याची राजकीय स्थिती पाहता ठाकरे बंधू एकत्र येणं तितकं सोपं आहे का? त्यांच्यापुढे नेमकी आव्हान काय असतील? याविषयी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडलेला हा दृष्टिकोन.