या आहेत हिमांशी नरवाल. पहलगाममधील हल्ल्यात मारले गेलेल्या नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी ज्यांनी लग्नाच्या अवघ्या सात दिवसांनंतर आपल्या पतीला दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेलं पाहिलं. या घटनेनंतर सर्वच स्तरातून हिमांशी यांच्याप्रती संवेदना व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र आता याच हिमांशी नरवाल यांच्या एका विधानावरून त्यांना ट्रोल केलं जात आहे. त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमावर आता राष्ट्रीय महिला आयोगाकडून हिमांशी यांच्या समर्थनार्थ एक निवेदन जारी करण्यात आलं आहे.


















