Eknath Shinde Reacts On Pakistan Breaking Ceasefire: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तानवर तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. शिंदे म्हणाले की, “पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी भारताच्या डीजीएमओशी बोलून स्वतः शस्त्रविरामाला तयारी दाखवली होती भारत नेहमीच आपली वचनबद्धता पूर्ण करतो. पण पाकिस्तानने बेईमानी केली… पाकिस्तानला स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी शस्त्रविरामाला सहमती दर्शवली होती… पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहित होते की हे पाकिस्तानी असे कृत्य करतील. म्हणूनच त्यांनी शस्त्रविरामाचा उल्लेखही केला नाही… पाकिस्तानला माहित आहे की जर त्यांनी भारताशी लढा दिला तर ते हरतील…”