पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारतीय वायूदलानं या दहशतवादी संघटनांविरोधात मोठी मोहीम आखली होती. भारतीय वायूदलानं पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर क्षेपणास्रे डागली, या तळांवर बॉम्बवर्षाव केला. भारतीय वायूदलानं केलेल्या या अचूक हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी वायू दलाच्या पायाभूत सुविधांचा तब्बल २० टक्के भाग नुकसानग्रस्त झाला आहे. पाकिस्तानी वायू दलाची अनेक लढाऊ विमाने नष्ट झाली आहेत. भारतीय संरक्षण विभागातील अधिकृत सूत्रांनी मंगळवारी याबाबतची माहिती जाहीर केली.