BJP Leader Babban Singh Raghuvanshi Obscene Video Viral Removed From Party: भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा एका सार्वजनिक कार्यक्रमात एका नर्तकीसोबत अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ ऑनलाइन वेगाने व्हायरल होत आहे. आणि यानंतर आता भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते बब्बन सिंह रघुवंशी यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे. एका लग्न समारंभातील हा व्हिडिओ असल्याची माहिती स्वतः रघुवंशी यांनी दिली आहे. बांसडीह विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी उमेदवार रघुवंशी हे एका महिला नर्तकीसोबत बसलेले आणि अश्लील वर्तन करताना दिसत आहेत. ती त्यांच्या मांडीवर बसलेली असताना ते महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहेत.















