Blind Women Beaten in Mumbai Local by Mohammad Baig: कांजूरमार्ग रेल्वे स्थानकातून टिटवाळ्याला जाण्यासाठी एका अंध महिलेने गाडी पकडली. ती दिव्यांगांच्या डब्यात चढली. तिला सीटवर बसू न दिल्याच्या कारणावरुन तिला एका धडधाकट प्रवाशाने मारहाण केली. या मारहाणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या घटनेची गंभीर दखल कल्याण रेल्वे पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी अंध महिलेला मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मोहम्मद बेग याला मुंब्रा येथून अटक केली आहे.