Aaditya Thackeray:मुंबईसह राज्यभरात पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले आहेत. मुंबईतील ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबले आहेत, त्या भागांची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली. पाहणी करताना आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका देखील केली आहे.