महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना खासदार संजय राऊतांनी दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रातील विजय हायजॅक केला. निवडणूक यंत्रणा, आयुक्त ताब्यात घेतले. त्यानुसर नेमणुका झाल्या ईव्हीएम मशिनची समस्या आहेच. शेवटच्या दोन तासात ६० ते ६५ लाख मतदान वाढवलं गेलं. हे सगळं एका सेटिंगप्रमाणे झालं. राहुल गांधींना हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला, असं संजय राऊत म्हणाले.