अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेवर हळहळ व्यक्त केली जात असताना अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. “अपघात झाला कसा? हे जगातल्या सिव्हिल एव्हिएशन क्षेत्राला पडलेलं कोडं आहे. ३० सेकंदात हे घडलं कसं? एकाच वेळी दोन इंजिनं बंद पडली कशी?” असा प्रश्न खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.