अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये २७० हून अधिक लोकांचे प्राण गेले. विमानात बसलेल्या २४२ प्रवाशांपैकी २४१ प्रवासी मृत्यू पावले. तर विमान ज्याठिकाणी कोसळलं तिथे ३० हून अधिक जणांचे मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. एअर इंडियाचं एआय-१७१ हे विमान मेघानी नगर भागातील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाला जाऊन आदळलं होतं. या वसतिगृहाच्या मागच्या बाजूस काही विद्यार्थी राहत होते. इमारतीला आग लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या घेतल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.