गावातील विकास कामांसाठी निधी देऊनही कमी मतदान झाल्याचं म्हणत भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी गावकऱ्यांना खडसावलं. निवडणुकीच्यानंतर राज्याच्या तिजोरीत पैसे नसतील याची खात्री होती. बोरगाव हे टाॅपचं गाव होतं. खात्री होती की आपल्याला इथून ५०-६० टक्के मतदान होईल. पण गाव पांगलं. पोरं सोरं उधळले. तुमच्या गावाला ८ कोटी देऊन पण बबनराव मागे कसा? असा प्रश्न बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केला. त्यामुळे बबनरावांच्या या विधानाने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.