‘कारवी’ची ‘खरवर’ जातीची वनस्पती पाचगणी पॉल हॅरिसन दरी फुलल्याने ही सारी दरीच जांभळय़ा रंगात न्हाहली आहे. कारवीची ही जात दर सोळा वर्षांनंतर फुलत असल्याचे वनस्पती अभ्यासकांनी सांगितले.
कारवी या वनस्पतीचे महत्त्वाचे चार ते पाच प्रकार असून प्रत्येक प्रकाराची कारवी फुलण्याची वेगवेगळी वर्षे आहेत. त्यात ‘कारवी व्हाईटी’ हा प्रकार दर सात वर्षांने फुलतो, तर ‘आकरा’ हा प्रकार दर चार वर्षांने फुलतो. सध्या या पठारावर फुललेला ‘खरवर’ हा प्रकार प्रत्येक १६ वर्षांनी फुलतो. अॅकॅन्थॅसिया कुटुंबातील ही स्टॉबीलँन्धस प्रजातीत मोडणारी वनस्पती आहे. यापूर्वी ही खरवर वनस्पती १९९७ च्या सुमारास फुलोऱ्यावर होती. त्यानंतर यावर्षी ही वनस्पती व तिचा फुलोरा पाहण्याचा योग स्थानिकांसह वनस्पती अभ्यासक, मधपाळ शेतकरी यांना येत असल्याने त्यांच्यात अत्यंत समाधानाचे वातावरण पहाण्यास मिळत आहे.
कारवी व तिचे सर्व प्रकार हे महाबळेश्वर
महाबळेश्वरवरून पांचगणी मार्गे वाईकडे जात असता पाचगणी पासून सुमारे २ कि.मी. अंतरावर दांडेघर गाव आहे. दांडेघर गावापासून ते पांचगणीच्या थाप्यापर्यंत (पॉल हॅरिसन दरीपर्यंतच्या) एक ते दीड कि.मी.च्या पट्टय़ातील डावीकडील बाजूस वळणावळणाचा रस्ता (घाट) लागतो. या घाट रस्त्याच्या दरीत सध्या आपल्याला फुललेल्या खरवर फुलांचे ताटवे पहावयास मिळतात.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2013 रोजी प्रकाशित
महाबळेश्वरमध्ये फुलली कारवी
‘कारवी’ची ‘खरवर’ जातीची वनस्पती पाचगणी पॉल हॅरिसन दरी फुलल्याने ही सारी दरीच जांभळय़ा रंगात न्हाहली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-09-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karvi swelled in mahabaleswar