मुळजी जेठा महाविद्यालयात कृषी क्षेत्रातील जैव तंत्रज्ञानातील अद्ययावत माहितीविषयक दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप प्रा. उषा मानुधने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या वेळी प्रा. मानुधने यांनी कोणतेही संशोधन केवळ शोधनिबंधाच्या सादरीकरणापुरते कागदोपत्री न राहता समाजोपयोगी ठरावे अशी अपेक्षा व्यक्त केली. शाश्वत विकास साधत असताना राष्ट्रीय अर्थकारण आणि शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरेल असे संशोधन सातत्याने होणे आवश्यक आहे. याकरिता संशोधकांची सर्जनशीलता तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी उपयोगात आणली पाहिजे, असे अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य एल. ए. पाटील यांनी सांगितले. डॉ. सुदाम पाटील, डॉ. डी. एच. मोरे, डॉ. एस. बी. चिंचोलकर, डॉ. अशोक गिरी आदी विषयतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-02-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sendoff of national parishad wich is in jetha college