आजारी वृद्ध वडिलांच्या उपचारासाठीचा खर्च झेपत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या एका तरुणाने रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्येचा मार्ग पत्करला. शहरातील संभाजी अर्थात कंबर तलावाजवळ ही घटना घडली.
राहुल बाळू पाटील (वय २९, रा. केगाव, ता. उत्तर सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याचे वृद्ध वडील आजारी असून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु उपचाराचा खर्च वाढत गेल्याने व तो झेपत नसल्याने राहुल हा निराश झाला होता. त्यातूनच आपण वडिलांसाठी काही करू शकत नसल्याच्या जाणिवेने वैफल्यग्रस्त होऊन त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth suicide