एजाज पटेल Videos
 अजाज पटेल हा भारतीय वंशाचा न्यूझीलंड संघाकडून खेळणारा क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म २१ ऑक्टोबर १९८८ रोजी मुंबईमध्ये झाला. वयवर्ष आठ असताना तो कुटुंबासह न्यूझीलंडला स्थायिक झाला.गेल्या काही वर्षांपासून तो न्यूझीलंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघामध्ये त्याला सामील करण्यात आले. लगेचच त्याला कसोटी सामना खेळायची संधी मिळाली. या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केल्याने तो सर्वांच्या लक्षात राहिला. डिसेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारत या कसोटी सामन्यामध्ये त्याने इतिहास घडवला. या सामन्यामध्ये त्याने भारताचे सर्व गडी बाद करत विक्रत स्वत:च्या नावावर केला. जिम लेकर आणि अनिल कुबंळे यांच्यानंतर ही कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज आहे.Read More 
   
   
   
   
   
   
  