scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

महादेव जानकर Photos

महादेव जानकर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे राजकीय नेते असून ते धनगर समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांचा जन्म १९ एप्रिल १९६८ साली सातारा जिल्ह्यातील पलसावडे या गावात झाला. महादेव जानकर यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात कांशीराम यांच्या नेतृत्वातील बहूजन समाज पक्षातून केली. तसेच ते यशवंत सेना या सांस्कृतिक संघटनेचेही प्रमुख होते.


पुढे २००३ मध्ये त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. २००९ मध्ये त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. तसेच २०१४ मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २०१४ मध्ये भाजपा-शिवसेनेने सत्तेत आल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर पाठवले. तसेच त्यांना राज्य मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले होते. महादेव जानकर यांनी २०२४ च्या निवडणूकही लढवली होती. मात्र, या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.


Read More