scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

प्रजासत्ताक दिन परेड Videos

दरवर्षी, प्रजासत्ताक दिन (Republic Day) संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहत साजरा केला जातो. १९५० मध्ये या दिवशी भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता. 


 


भारतीय राज्यघटनेने देशाला प्रजासत्ताक आणि लोकशाही म्हणून घोषित केले. दरवर्षी, प्रजासत्ताक दिन हा भारतीय राज्यघटनेतील मूल्ये आणि नैतिक मुल्यांचे स्मरण म्हणून साजरा केला जातो आणि आपल्याला आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे आपण कायम ऋणी आहोत त्यांचे स्मरण केले पाहिजे.


 


दरवर्षी २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत राजपथावर भव्य परेड (Republic Day Parade) पार पडते. राजपथ ज्याला कर्तव्य पथ असेही म्हटले जाते जे देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक दर्शवते आणि लष्करी पराक्रमाचे शक्तिप्रदर्शन करते. विविध राज्यांची संस्कृतीची झलक दाखवणारे चित्ररथांचेही संचलन पार पडते. 


 


प्रजासत्ताक दिनाचा हा उत्सव तीन दिवस चालतो आणि २८ जानेवारी रोजी बीटिंग रिट्रीट समारंभाने त्याची समाप्ती होते. विशेष दिवस साजरा करण्यासाठी आपण तयारी करत असताना, प्रजासत्ताक दिनाच्या परेडबद्दल काही रंजक गोष्टी येथे आहेत ज्याबद्दल आपल्याला माहित असले पाहिजे.


 


दरवर्षी, प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती किंवा राष्ट्राच्या राज्यकर्त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. यावर्षी, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत.


 


Read More