scorecardresearch

समाजवादी पार्टी News

समाजवादी पक्ष (Samajwadi Party) हा भारतातील एक प्रमुख राजकीय पक्ष असून तो उत्तर प्रदेश राज्यात सक्रिय आहे. या पक्षाची स्थापना ४ ऑक्टोबर १९९२ रोजी झाली होती. दिवंगत मुलायमसिंह यादव हे या पक्षाचे संस्थापक आहेत. त्यांचे पुत्र तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. सध्या ३७ सदस्यांसह समाजवादी पक्ष हा लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे.


पक्षाचे बलस्थान हे उत्तरप्रदेश असले तरी देशातील इतर राज्यांमध्येही या पक्षाची लक्षणीय उपस्थिती आहे. पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये ४ वेळा सत्ता स्थापन केली आहे. तीन वेळा मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वात तर एक वेळा त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांच्या नेतृत्तवात. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. ४०३ जागांपैकी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस युतीला केवळ ४७ जागांवर यश मिळाले. तर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३१२ जागा जिंकत राज्यात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली होती. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतही समाजवादी पक्षाचा पराभव झाला होता. समावादी पक्ष युतीला केवळ १११ जागा जिंकता आल्या. तेव्हाही राज्यात भाजप आघाडीने बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली.


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाकडून भाजपला मोठा फटका बसला होता. पक्षाला केवळ ५ जागा जिंकता आल्या. त्यानंतर अलिकडेच हा पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने ३७ जागा जिंकल्या आणि १८ व्या लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा पक्ष झाला.


Read More
डिंपल यादव समाजवादी पक्षाचा राष्ट्रीय चेहरा म्हणून प्रस्थापित होत आहेत का?

२०२४ च्या निवडणुकीआधी ऑक्टोबर २०२३ मध्ये डिंपल यांनी चेन्नईतील द्रमुक पक्षाने आयोजित केलेल्या महिला हक्क परिषदेच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.…

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व समाजवादी पार्टीच्या आमदार पूजा पाल (छायाचित्र पीटीआय)
योगी आदित्यनाथांचं कौतुक करणाऱ्या महिला आमदाराची पक्षातून हकालपट्टी; कोण आहेत पूजा पाल? फ्रीमियम स्टोरी

Pooja Pal Expulsion : आमदार पूजा पाल यांची समाजवादी पार्टीने पक्षातून हकालपट्टी केली आहे, नेमकं काय आहे यामागचं कारण? जाणून…

Expelled SP MLA Pooja Pal
MLA Pooja Pal: योगी आदित्यनाथ यांची स्तुती केल्यामुळे अखिलेश यादव यांनी महिला आमदाराची पक्षातून केली हकालपट्टी, पूजा पाल म्हणाल्या, “माझ्या पतीची हत्या…”

Expelled SP MLA Pooja Pal: समाजवादी पक्षाच्या आमदार पूजा पाल यांनी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती केली यामुळे…

Maulana Sajid Rashidi On dimple yadav
खासदार डिंपल यादवांचा मौलानांकडून अपमान; भाजपाचे समाजवादी पक्षावर आरोप, नेमका वाद काय?

Misogynistic remarks on Dimple Yadav उत्तर प्रदेशमध्ये धर्मगुरूंच्या स्त्री-विरोधी वक्तव्यांमुळे नवे वादळ निर्माण झाले आहे. वृंदावनच्या एका संतांच्या टिप्पणीनंतर वाद…

latest marathi news
PM Modi: “पाकिस्तान अस्वस्थ, पण वेदना मात्र काँग्रेस आणि…”, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

PM Modi On Operation Sindoor: पंतप्रधानांनी यावेळी यावर भर दिला की, ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे गुन्हेगार देखील…

अखिलेश यांच्या मशिदीतील भेटीवर आरोप, डिंपल यांच्या पोशाखावरूनही टीका; भाजपा आणि समाजवादी पक्षाचा नेमका वाद काय?

अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांच्या या भेटीबाबत भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी आरोप केला आहे की, अखिलेश…

Samajwadi Party MLA Rais Sheikh claim regarding the post of Mayor Mumbai print new
पारशी, बोहरी, आगरी मुंबईचा महापौर बनू शकतो, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचा दावा

मुंबई शहर सर्व जाती धर्मियांचे असुन या शहराच्या महापौरपदी पारशी, बोहरी, खोजा, मेमन, पटेल, आगरी, कोळी, मुस्लीम महापौर राहिलेले आहेत.

Abu Azmi
“हिंदीला राष्ट्रभाषा घोषित करा”, अबू आझमींची मागणी; म्हणाले, “काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एक भाषा…”

Abu Azmi on Hindi Language : शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी रेटण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न होत असताना त्याला राज्यातील जनतेकडून…

Pandharpur Wari Why Did Abu Azmi's Remarks Spark Political Row In Maharashtra
पंढरपूरच्या वारीबाबत अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले; काय आहे नेमकं प्रकरण?

Abu azmi on pandharpur wari पंढरपूर वारीवरील आझमींच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.

ताज्या बातम्या