scorecardresearch

शिवजयंती २०२५ Photos

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह भारतभर साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३०) रोजी शिवरायांचा जन्म झाला होता. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्तासाठी हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो. गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली जात आहे. १८६९ मध्ये महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर १८७० मध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली गेली. पुढे ब्रिटिशांविरोधात भारतीय जनमानसामध्ये एकी निर्माण व्हावी, यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवासह सार्वजनिक शिवजयंतीच्या प्रथेची सुरुवात केली. १८९५ मध्ये पहिल्यांदा शिवजयंतीचा उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा केला गेला. राज्य सरकारने २००१ मध्ये १९ फेब्रुवारी १६३० ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. शिवरायांची जयंती तिथीनुसार साजरी करावी की तारखेनुसार या मुद्यावरुन महाराष्ट्रामध्ये वाद आहे. त्यामुळे तारखेला मान्यता देणारा गट १९ फेब्रुवारीच्या दिवशी शिवजयंती आहे असे मानतो. तर फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार शिवजयंती साजरी करणारा एक गट आहे.Read More
Shiv Jayanti Celebration photos
13 Photos
छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५वी जयंती राज्यभरात उत्साहात साजरी, पाहा खास फोटो…

Shiv Jayanti 2025: ३९५ व्या जयंतीनिमित्त शिवभक्तांनी विविध देखावेही सादर तयार केल्याचं पाहायला मिळालं.

Mahesh Manjarekar to amol kolhe these Actors played the role of Chhatrapati Shivaji maharaj
13 Photos
महेश मांजरेकर ते अमोल कोल्हे, ‘या’ अभिनेत्यांनी पडद्यावर साकारले शिवराय…

Shiv Jayanti 2025 : ‘हिरकणी’ या स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात प्रसाद ओकने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. पण त्याच्या…

Vyom Vaikul Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025
10 Photos
Photos: बालकलाकार मायरा वायकुळच्या भावाचं बाल शिवरायांच्या रुपात सुंदर फोटोशूट

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते.

ताज्या बातम्या