गृह कर्ज तसेच रिटेल (किरकोळ) कर्जाच्या व्यवसायावर भर देऊन या कर्जसंबंधी प्रक्रिया अधिक गतिमान करावी, असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष एस. मुनोत यांनी बँकेच्या ३३ क्षेत्रांच्या प्रमुखांपुढे बोलताना केले. या राष्ट्रीयीकृत बँकेच्या पुणे येथील मुख्यालयामध्ये नुकत्याच झालेल्या समीक्षा बैठकीला मुनोत यांनी मार्गदर्शन केले. बचत आणि चालू खाते वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. तसेच कर्जवसुलीची प्रक्रियाही गतिमान करून त्या संबंधीचा प्रक्रिया व पाठपुरावा सत्वर करण्याचेही त्यांनी आवाहन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahabank in retail