वायू उत्खननात संयुक्त भागीदारी असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी व ऑइल इंडिया यांनी खासगी क्षेत्रातील व्हिडिओकॉनच्या मोझम्बिक वायूनिर्मिती क्षेत्रातील १० टक्के हिस्सा खरेदी केला आहे. मॉरिशसनजीकच्या मोझम्बिक भागातील समुद्रात ६५ लाख कोटी क्युबिक फूट वायू उत्पादनक्षमता असलेले हे क्षेत्र आहे.
२४७.५० कोटी डॉलरचा हा व्यवहार उभय कंपनीचा गेल्या वर्षभरातील तिसरा ताबा व्यवहार आहे. ओएनजीसीची विदेशातील अंगिकृत कंपनी ‘ओएनजीसी विदेश लिमिटेड’द्वारे ही ताबा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
व्हिडीओकॉन मोझाम्बिक रोवुमातील १०० टक्के भाग खरेदीच्या या व्यवहारासाठी उभय कंपन्यांनी व्हिडीओकॉन मॉरिशस एनर्जी लिमिटेडबरोबर करार केला. ओएनजीसीची यात ६० टक्के तर ऑइल इंडियाची ४० टक्के भागीदारी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ongc oil india to buy videocon stake in mozambique field for 2 5 bn