Rahu Gochar Effect on Maharashtra Leaders: राहू गोचराचा राजकारणातील मंडळींवर प्रभाव कसा होणार हे पाहताना राष्ट्रीय नेत्यांच्या कुंडलीवरून विश्लेषण आपण मागील भागात पाहिले. आता या लेखात आपण महाराष्ट्रातील नेतेमंडळींची कुंडली काय सांगते हे जाणून घेणार आहोत. ज्योतिषतज्ज्ञ उदयराज साने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, शरद पवार अशा सर्व पक्षातील नेत्यांच्या राशिनुरूप त्यांच्यावर काय प्रभाव होणे अपेक्षित आहे याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. चला पाहूया ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहू गोचराआधी ज्योतिषांनी मांडली महाराष्ट्रातील नेत्यांची कुंडली

१. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Kundali)

नोव्हेंबर मध्ये बदलणारा राहू त्यांच्या मेष लग्नाच्या व्यय स्थानात येत असून, त्यांच्या मूळ कुंडलीतील राहुच्या दशमात येत आहे, त्यामुळे हा राहू त्यांना अतिशय चांगली फळे देणार आहे. त्यांच्या शिवसेनेतील काही नेते येणाऱ्या २०२४ लोकसभेत निश्चितपणे प्रवेश करतील. त्यांचा मूळचा राहू बलवान असल्यामूळे शत्रू पक्षातील नेते मंडळींचा बुद्धीभेद करण्यात त्यांना विलक्षण यश मिळेल.

२. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Kundali)

फडणवीस यांच्या कुंडलीत मीन राशीतील गोचर राहूचे भ्रमण सप्तमस्थानातून होणार आहे. या राहू मुळे त्यांच्या मनस्थितीचा अंदाज इतरांना येणार नाही. त्यांच्या मूळ कुंडलीतील मंगळ-राहू षडाष्टक, राहू-नेपच्यून केंद्रयोग या महत्त्वाच्या योगामुळे ते राजकारणातील कमालीची गुप्तता पाळू शकतात. मीन राशीतील राहू निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी उपयोगी पडेल.

३. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Kundali)

अजित पवार यांच्या कुंडलीत येणारा मीन राशीतील राहू, हा मूळ कुंडलीतील चंद्राच्या षडाष्टकात येत आहे. त्यांच्या मूळ कुंडलीत शनी-राहू केंद्र योगात आहेत. गोचर कुंभ राशीतील शनी हा रवीला ओलांडून मूळ कुंडलीतील बुधा च्या षडाष्टकातून जाणार आहे. मीन राशीतील राहू त्यांना संमिश्र असून, २०२४ च्या निवडणुकीत स्वतःच्या पक्षाच्या लोकांना नव्या लोकसभेत पाठवण्यासाठी त्यांनाही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असली तरी, राष्ट्रवादीतील फूट यामुळे चांगलीच स्पष्ट आणि ठळकपणे दिसून येईल. त्यांना गुरु ग्रहाची चांगली अनुकूलता असल्याने, त्यांच्या नव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेत स्वतःचा उमेदवार आणणे शक्य होणार आहे.

४. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Kundali)

ठाकरेंच्या कुंडलीत मीन राशीत प्रवेश करत असलेला राहू, नोव्हेंबर नंतर त्यांच्या कुंडलीतील चंद्राला आठवा होणार असून, प्रकृतीच्या वाढत्या तक्रारी त्यांच्या मागे लागणार आहेत. कुंभ राशीतील शनी दिनांक 4 नोव्हेंबरला मार्गी होत असून, त्यांच्या मूळ कुंडलीतील रवि-चंद्र-राहू यांच्या अशुभ योगातून जाणार असल्याने, ह्या पुढील कोणत्याही निवडणुकीत त्यांच्याकडे असलेल्या पक्षाची अत्यंत वाईट अवस्था होणार असून येत्या निवडणुकांतून त्यांना सर्वत्र अपयश पहावे लागणार आहे. पुढील वर्षभर त्यांना प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे.

५. राज ठाकरे (Raj Thackeray Kundali)

मनसेचे सर्वेसर्वा यांच्या कुंडलीतील मीन राशीतील नोव्हेंबर पासून प्रवेश करणारा राहू, हा चंद्राच्या पराक्रमात येणारा असून, त्यांच्या मूळ कुंडलीतील राहू व शनी वरून त्याचं भ्रमण होणार असल्याने तो त्यांना अनुकूल आहे. पण त्यांच्या प्रकृतीस मात्र तापदायक आहे. कुंभ राशीतील शनी दिनांक 4 नोव्हेंबरला मार्गी होत असल्याने, येणाऱ्या सर्व निवडणुकांत संघर्ष अटळ असला तरी वर्गोत्तम रवी मूळे यशाचे दार मात्र त्यांच्या पक्षाला निश्चितच उघडलेले असेल असे ग्रह दर्शवतात.

६. शरद पवार (Sharad Pawar Kundali)

शरद पवारांच्या कुंडलीत मीन राशीत प्रवेश करणारा राहू हा त्यांच्या मूळ कुंडलीतील चंद्राला बारावा राहणार असल्याने आजारपण आणखी वाढू शकते. त्यांच्यावर उपचार करताना गडबड होऊ शकते. कुंभ राशीतील गोचर शनि, त्यांच्या कुंडलीतील रवी-बुधा च्या अशुभ योगातून जाणार असल्याने, शिल्लक राहिलेल्या पक्षाला यश मिळण्यात प्रचंड अडचणी दिसत असून पुढील राजकीय महत्वाकांक्षा आता धुळीला मिळणार असल्याचे ग्रह सुचवतात.

हे ही वाचा<< २०२४ आधी मोदी, गांधी, कुमार, बॅनर्जी यांचे कष्ट वाढवणार ‘राहू’! ज्योतिषांनी मांडली १० मोठ्या नेत्यांची कुंडली

आपण अनेक मान्यवर राजकीय नेत्यांच्या पत्रिकेतून, त्यांच्या कुंडलीत दिनांक २८ नोव्हेंबर पासून जो मीन राशीतील राहु भ्रमण आहे तो कसा आहे हे बघितल आहे. त्यात असं दिसून आलं की, मोजक्याच नेत्यांना हे येणार राहू भ्रमण राजकीय दृष्ट्या चांगले जाणार आहे. उर्वरित कोणालाही हे राहू भ्रमण अनुकूलता दाखवत नसल्याने येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत अथवा नोव्हेंबर नंतर होणाऱ्या निवडणुकीत त्यांना व त्यांच्या पक्षाला हे राहू भ्रमण बरंच प्रतिकूल आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis win eknath shinde has power but thackeray health issue how rahu gochar effect on maharashtra leaders svs