न्यायाची देवता म्हणून शनिदेवाला ओळखले जाते. ते माणसाच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार फळ देतात. जर एखाद्या व्यक्तीने वाईट कृत्ये केली तर त्याला शनिच्या साडेसातीचा सामना करावा लागतो. त्याचे जीवन दु:खाने भरते. त्याचबरोबर चांगले कर्म करणाऱ्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत. एकदा का तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी झाली तर माणसाच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नसते. तसेच, विशेष कर्म करणाऱ्या लोकांना शनिदेवांचा सदैव आशीर्वाद मिळतो. हे कर्म कोणते आहेत ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • पितरांचे श्राद्ध

पितरांचे श्राद्ध करणाऱ्यांवर शनिदेवाची कृपा होते. पितरांच्या श्राद्धाने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांचे सर्व संकट दूर करतात. पितृ पक्षातील शनिवारी आणि अमावस्येला शनिदेवाची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

Astrology: कुंडलीतील ‘हे’ संकेत सांगतात तुमच्यावर देवाची कृपा आहे की नाही! जाणून घ्या

  • पिंपळाच्या झाडाची पूजा

शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. यासोबतच त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पिंपळाचे रोपही लावता येईल.

  • स्वच्छता राखणे

शनिदेवाला स्वच्छता खूप आवडते. अशा परिस्थितीत घर नेहमी स्वच्छ ठेवा. शारीरिकदृष्ट्याही निरोगी राहा. नखे नियमितपणे साफ करत राहा आणि त्यांना वाढू देऊ नका. जे स्वच्छतेची विशेष काळजी घेतात, त्यांना शनि कधीही त्रास देत नाही.

Weekly Horoscope 22-28 August 2022: ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार परदेशवारीचे संकेत; जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशीभविष्य

  • शनिवारचे व्रत

शनिवारी उपवास केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव सुरू होतो. या दिवशी व्रतासह दान करा. गरीब आणि गरजूंना जेवू घातल्याने शनिदेवाचा अपार आशीर्वाद मिळतो. घरात कशाचीही कमतरता भासत नाही.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you have these qualities too then there will be the grace of saturn you will never have to face sadesati pvp