Akhand Samrajya RajYog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव १७ जानेवारीला म्हणजेच आज आणि गुरु गुरू एप्रिलमध्ये राशी बदलणार आहेत. ज्यामुळे अखंड साम्राज्‍य राजयोग तयार होत आहे. जेव्हा एखादा ग्रह उत्पन्न (अकराव्या) आणि दुसऱ्या (धन) घरात जास्त वेळ विराजमान होतो तेव्हा हा योग तयार होतो. या योगाने व्यक्तीला धनाची प्राप्ती होते. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा योग शुभ सिद्ध होऊ शकतो…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष राशी

अखंड साम्राज्य राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण शनिदेव तुमच्या संक्रमण कुंडलीच्या उत्पन्नाच्या घरात बसतील. त्यामुळे तुम्हाला वर्षभरात प्रचंड पैसे मिळू शकतात. तसेच जे निर्यात आणि आयात व्यवसाय करतात त्यांना चांगला नफा मिळू शकतो. यावेळी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगले पैसे मिळू शकतात. त्याच वेळी, आपण राजकीय किंवा प्रशासकीय क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकता.

मिथुन राशी

अखंड साम्राज्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण १७ जानेवारीपासून तुमच्यावरील शनि साडेसतीचा प्रभाव संपेल. तसेच २२ एप्रिल नंतर तुमच्या संक्रमण कुंडलीत गुरू उत्पन्नाच्या घरात विराजमान होतील. म्हणूनच यावेळी नोकरी व्यवसायातील लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढीची शक्यता आहे. तसेच तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता देखील याकाळात मिळू शकते. यासोबतच २२ एप्रिलनंतर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नफाही मिळू शकतो.

( हे ही वाचा: तब्बल ३० वर्षांनी झाली शनि- सुर्याची युती; वर्षभरात ‘या’ राशी होऊ शकतात प्रचंड श्रीमंत)

मकर राशी

अखंड साम्राज्य राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. कारण १७ जानेवारीला शनिदेवाच्या संक्रमणानंतर शनि तुमच्या धनस्थानावर विराजमान होणार आहेत. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. याकाळात तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. यासोबतच तुमच्या कुटुंबातील मतभेद दूर होतील. वैवाहिक जीवनात संबंध सुधारतील. दुसरीकडे, २२ एप्रिलनंतर तुम्ही परदेशात प्रवास करू शकता.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे )

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani and jupiter will make akhand samrajya rajyog 2023 these zodiacs sign can get huge amount of money gps