Vastu Shastra Rules While Eating: एका ताटात जेवल्याने, उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढतं असं आपण आजवर कितीतरी वेळा ऐकले असेल. मात्र वास्तुशास्त्रातून समोर आलेल्या माहितीनुसार असं करणे हे पती पत्नीच्या संबंधांसाठी घातक मानले जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये भीष्म पितामह यांनीही याबाबत माहिती दिली आहे. महाभारतातही या नियमांचा उल्लेख आहे. पती पत्नीने एका ताटात का जेवू नये याबाबत नेमकं काय म्हंटलं आहे याविषयी सावितर जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भीष्म पितामह यांनी आदर्श जीवनशैलीविषयी भाष्य केले असता यात असे म्हंटले की एक सामान्य माणूस आपल्या आयुष्यात अनेक नाती निर्माण करतो व त्या प्रत्येक नात्यासाठी त्याची वेगळी जबाबदारी असते. या जबाबदाऱ्या जेव्हा तुम्ही योग्य रीतीने व आनंदाने पार पाडता तेव्हाच तुम्हाला प्रत्येक नात्यात सुख प्राप्तहोते. जर पती पत्नी यांनी एका ताटात अन्न ग्रहण केले तर त्यावेळी त्यांच्याकडून एकमेकांची तुलना केली जाण्याची शक्यता असते. यामध्ये जर चुकून त्यांचे एकमत झाले तर घरातील अन्य सदस्यांप्रती रोष वाढू शकतो अन्यथा त्यांचे एकमेकांमध्येच भांडण होण्याची शक्यता अधिक असते.

Tulsi Vastu Tips for Home: दारात तुळस वाढतच नाही? तुळशीचे प्रकार व लागवडीचा शुभ मुहूर्त पाहा

पती पत्नीच्या नात्यावरही भीष्म पितामह यांनी भाष्य केले आहे. जेव्हा एखादी स्त्री प्रेम करते तेव्हा त्यात जीव ओतते मात्र हे अति प्रेम बुद्धीला भ्रष्ट करू शकते. एका ताटात जेवल्याने अनेकदा अवलंबत्व वाढते व त्यामुळे एकानेच समजून घ्यायचं व दुसऱ्याची मनमानी असे समीकरण होते. यामध्ये पडती बाजू घेणाऱ्याचा एखाद्या वेळी उद्रेक झाला तर पुढे वाद होऊ शकतात. यामुळे पती व पत्नीने सहसा एका ताटात जेवूच नये असा सल्ला दिला जातो. प्रत्येक कुटुंबाने दिवसातील एक वेळचे जेवण तरी एकत्र बसून करावे यामुळे एकोपा वाढण्यास मदत होते असेही अनेक धर्मग्रंथांमध्ये नमूद केले आहे.

Vastu Tips For Kitchen: आनंदी कुटुंबाच्या किचन मध्ये नेहमी दिसतात हे ‘५’ रंग; जाणून घ्या कसा होतो लाभ

दरम्यान, महाभारतात देण्यात आलेल्या काही संदर्भांनुसार कोणते अन्न ग्रहण करू नये याबाबतही सांगितले आहे. केवळ शिळं अन्नच नव्हे तर कधीही कोणीही ओलांडून गेलेलं अन्न खाऊ नये असेही सांगितले जाते. जर जेवणात केस किंवा खडा आला तर आर्थिक नुकसानाची शक्यता असते.

(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vastu shastra why husband and wife should not eat in same plate bhisma pitamah answers in maharbharat svs
First published on: 01-10-2022 at 10:45 IST