वास्तुशास्त्रात स्वस्तिक चिन्ह खूप शक्तिशाली असल्याचे सांगितले आहे. कोणतेही शुभ कार्य, पूजा-अर्चा इत्यादी करताना सर्वप्रथम स्वस्तिकाचे चिन्ह बनवले जाते. स्वस्तिक चिन्हाचा वापर केल्याने घरात सकारात्मकता, एकाग्रता, आनंद आणि समृद्धी येते. तसेच यामुळे कामात यश मिळते. म्हणूनच प्रत्येक कामाची सुरुवात स्वस्तिक चिन्ह लावून केली जाते. त्याचा उपयोग केल्याने अनेक प्रकारचे वास्तु दोष दूर करता येऊ शकतात. पण स्वस्तिक बनवताना केलेली लहानशी चूक महागात पडू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वस्तिकाचे चिन्ह योग्य पद्धतीने बनवले तर अनेक फायदे होतात. ते बनवल्याने आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मकता येते. लोकांची एकाग्रता वाढते. वास्तुदोष दूर होतात. जीवनात संपत्ती येते. त्याचबरोबर आजार आणि तणावापासून दूर ठेवण्याची ताकदही त्यामध्ये आहे. याउलट स्वस्तिक बनवताना झालेली चूकही मोठा त्रास देऊ शकते, त्यामुळे ते बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Zodiac Sign: ‘या’ राशींच्या मुलींवर असते शुक्र-शनिची विशेष कृपा; आर्थिक बाबतीत मिळते नशिबाची साथ

स्वस्तिक बनवताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

  • स्वस्तिक सरळ काढावे. उलटे स्वस्तिक बनवणे खूप त्रासदायक ठरू शकते. यामुळे जीवनात अनेक संकटे येऊ शकतात.
  • स्वस्तिक सरळ काढण्यासह त्याच्या रेषा आणि कोन योग्य प्रमाणात असावेत. ते लहान किंवा मोठे असणे चांगले मानले जात नाही.
  • स्वस्तिकचे शुभ चिन्ह लाल, पिवळे आणि निळ्या रंगांनीच बनवावे. यामध्ये लाल आणि पिवळा रंग सर्वात शुभ मानला जातो. याशिवाय इतर कोणत्याही रंगाने बनवलेले स्वस्तिक अशुभ मानले जाते.
  • ज्यांना स्वस्तिक परिधान करायचे आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे की स्वस्तिकाभोवती गोलाकार कडी असावी. सोन्याच्या किंवा चांदीच्या गोलाकार वर्तुळामध्ये बनवलेले स्वस्तिक लाल धाग्यात धारण केल्याने एकाग्रता वाढते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vastu tips take care of these things while making swastika otherwise there will be serious consequences pvp
First published on: 14-08-2022 at 20:01 IST