जीवाश्म खडकात आढळतात, म्हणून जीवाश्मांचा अभ्यास भूविज्ञानात करतात. पण जीवाश्म हे सजीवांचे अवशेष असल्याने त्यांचा अभ्यास जीवविज्ञानातही करतात. म्हणूनच पुराजीवविज्ञानाला, म्हणजे जीवाश्मांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानशाखेला, भूविज्ञान आणि जीवविज्ञान यांच्या सीमारेषेवरील विज्ञानशाखा म्हणतात.