11 August 2020

News Flash

Ishita

अजिंक्यता-यावर शिवरायांचा पुतळा मेघडंबरीसह बसवावा

आगामी दुर्ग साहित्यसंमेलन पुरंदर किंवा सिंहगडावर, महाराष्ट्रातील दुर्ग युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये समाविष्ट व्हावे या दोन ठरावांसह अजिंक्यतारा किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि मेघडंबरी उभारण्यात यावी या मुख्य मागणीने गेले तीन दिवस सुरू असलेल्या चतुर्थ दुर्ग साहित्यसंमेलनाचे सूप वाजले.

कापड दुकानाला लागलेल्या आगीत ८० लाखांचे नुकसान

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या भाजीपाला बाजारामध्ये असलेल्या कापड दुकानाला रविवारी सकाळी लागलेल्या आगीत सुमारे ८० लाखांचे नुकसान झाले.

शिक्षक बँक संचालकांवर भ्रष्टाचाराचा आरोप

कोअर बँकिंगच्या नावाखाली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक मंडळ बँकेची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप करत व या खर्चाच्या स्पष्टीकरणाची मागणी करत विरोधी गुरुकुल मंडळाने, आज सायंकाळी बँकेच्या नगरमधील मुख्य कार्यालयासमोर प्रतीकात्मक ‘फटके मारो’ आंदोलन केले.

जिल्हाधिकारीपदी रुबल अग्रवाल रुजू

जिल्हाधिकारीपदाची सूत्रे रुबल अग्रवाल यांनी आज, रविवारी सुटीच्या दिवशी तातडीने, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडून स्वीकारली.

वक्फच्या ६००पेक्षा अधिक जमीन प्रकरणांमध्ये अनियमितता

महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळातील तत्कालीन वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. डी. पठाण याच्या कार्यकाळातील ६०० पेक्षा अधिक प्रकरणांत अनियमितता आढळून आल्या आहेत. सुमारे ४०० एकराच्या भूखंडांचा गैरव्यवहार त्याने केला असल्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

वाळूतस्करांनी रोखले पोलिसांवर पिस्तूल, आठ अटकेत

बेकायदा वाळू वाहतूक करणा-या वाहनांना पकडणा-या पोलीस पथकाला वाळूतस्करांनी एअर पिस्तूल रोखून रस्ता अडविण्याचा प्रकार शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास पळसपूर व कर्जुले हर्या परिसरात घडला.

गजानन हुद्दार यांचे वृद्धापकाळाने निधन

सांगलीतील ज्येष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्यसनिक गजानन हुद्दार (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

राष्ट्रवादीच्याच सदस्यांचा विरोध लंघेंना अडचणीत आणण्याच्या हालचाली

प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडीच्या विषयावरून जिल्हा परिषदेत राजकारण पेटू लागले आहे. या विषयावरून जि.प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच सदस्यांनी आता हालचाली सुरू केल्या आहेत.

निलंगेकरांच्या बेरजेच्या राजकारणावर युवा पिढीने वाटचाल करावी : चाकूरकर

सर्व समाजघटकांना सोबत घेत सामान्य माणसाचा विकास डोळय़ांसमोर ठेवून आमदार डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागाचा विकास साधला. राजकारणात यशस्वी होण्यासाठी नव्या पिढीने डॉ. निलंगेकरांच्या बेरजेच्या राजकारणावर वाटचाल करावी, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.

जातीचे संघटन पुरोगामी; हिंदूंचे संघटन जातीयवादी कसे? – प्रा. शेषराव मोरे

सध्या देशात जातीच्या व पोटजातीच्या ऐक्याची हाक दिली जात आहे. जातीचे संघटन पुरोगामी व स्वागतार्ह मानले जाते. पण सर्व जाती एकत्र करून हिंदूचे संघटन करणा-यांना मात्र प्रतिगामी व जातीयवादी ठरवले जाते. या उलटय़ा न्यायाबद्दल प्रा. शेषराव मोरे यांनी सडकून टीका केली.

आ. कांबळे यांचा पोलिसांना इशारा

शहरातील वाढत्या चो-या रोखण्यात पोलिसांना अपयश येत असल्यामुळे आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांना निवेदन दिले.

सर्वात छोटी बाईक बनविणा-याची ‘पेटंट’साठी धडपड!

दोन महिन्यांपूर्वी अफरोज मुश्ताक या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात तिस-या वर्षांत शिकणा-या युवकाने सर्वात छोटी ‘बाईक’ बनविली.

व्यंगचित्रकारांच्या संघटनेला सहकार्य करू – डी. पी. सावंत

मराठी व्यंगचित्रकार अल्पसंख्य असले तरी त्यांच्या संमेलनाला या पुढे राजाश्रय निश्चित मिळवून देऊ, त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री व पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी दिली.

महापौरांसह पालिकेतील पदाधिका-यांनी परत केली वाहने

टोल विरोधातील आंदोलनाची धार वाढविताना शुक्रवारी महापौरांसह पालिकेतील पदाधिका-यांनी वाहने, भ्रमणध्वनी प्रशासनाकडे परत केले. महापौर सुनीता राऊत, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण हे रिक्षातून, तर सभापती व नगरसेवक खासगी वाहनांतून घरी गेले.

पंचगंगाकाठी फुललेला गुलाब परदेशी युगुलांच्या मदतीला

लंडन, इटली, ऑस्ट्रेलिया, जपान, दुबई अशा जगभरातील प्रेमिकांच्या हाती यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ला पंचगंगाकाठी फुललेला गुलाब असणार आहे. यासाठी श्रीवर्धन बायोटेकमधून यंदा पाच लाख मोहोक, सुगंधी गुलाब निर्यात होऊ लागला असून व्हॅलेनटाईन डेच्या पूर्वसंध्येला तेथील देशात तो पोहोचणार आहे.

साता-यातून उमेदवार कोण? म्हणून कोडय़ात पडणे गैर- डॉ. येळगावकर

लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडे उमेदवारांची कमतरता नाही. साता-यातून उमेदवार कोण? म्हणून कोडय़ात पडणे गैर असून, रामराजे निंबाळकर लढण्यासाठी तयार आहेतच पण, शरद पवारांनी सांगितल्यावर पालकमंत्री शशिकांत शिंदेही नकार देणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर यांनी सांगितले.

पक्षकार्याकडे दुर्लक्ष करणा-या पदाधिका-यांची संपर्कप्रमुखांकडून झाडाझडती

पदे घेऊन मिरविणा-या आणि पक्षकार्याकडे दुर्लक्ष करणा-या जिल्हय़ातील पदाधिका-यांची शुक्रवारी मनसेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी चांगलीच झाडाझडती घेतली.

महावितरणच्या मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण

महावितरण कंपनीतील रिक्त जागांवर कायम करावे, या मागणीसाठी गेल्या आठ वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचा-यांनी शुक्रवारपासून साखळी उपोषण सुरू केले. या कर्मचा-यांनी बुधवारपासून महावितरणच्या मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी शुक्रवारपासून साखळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला.

‘बाळासाहेब थोरातांना उज्ज्वल भवितव्य’

भाऊसाहेब थोरात आणि त्यानंतर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची कमान कधीही पडू दिली नाही. राज्याचे नाक समजले जाणारे महसूल खाते सांभाळणा-या बाळासाहेबांनी अठ्ठावीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात एकही डाग अंगावर पडू दिला नाही. त्यामुळेच त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यानी केले.

विरोधकांचे महसूल आयुक्तांना साकडे

महानगरपालिकेतील विविध समित्या तातडीने स्थापन करण्यासाठी विरोधकांनी आता हालचाली सुरू केल्या आहेत. विरोधी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीने याबाबत थेट विभागीय महसूल आयुक्तांना याबाबत निवेदन पाठवले आहे.

राज्यातील टोल संस्कृती हद्दपार करावी-कॉ.गोविंद पानसरे

कोल्हापुरातील जनतेने जसा टोल बंद पाडला त्याचप्रमाणे राज्यातील टोल संस्कृती हद्दपार करावी, असे मत कॉ.गोविंद पानसरे यांनी व्यक्त केले. आराम बस वाहतूकदारांचे सोनतळी येथे आयोजित केलेल्या शिबीरउद्घाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.

‘खा. वाकचौरेंचा आंदोलनाशी संबंध नाही’

अंगणवाडी कर्मचा-यांचा संप तूर्त स्थगित करण्यात आला आहे. संप मिटविण्यात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा काहीही संबंध नाही, पण ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

२० लाख कर्मचारी, अधिका-यांचा सहभाग

राज्य सरकारने विश्वासार्हता गमावल्याने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राजपत्रित अधिकारी महासंघ व शिक्षक १३ फेब्रुवारीपासून बेमुदत संपास सज्ज झाल्याचे आज संघटनेचे राज्य अध्यक्ष योगिराज खोंडे यांनी आज येथे जाहीर केले.

तीर्थक्षेत्र निधीवरून जि.प.त वादंग

तीर्थक्षेत्र विकास योजनेतील कामाच्या निधिवाटपाच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत आज भडका उडाला. पूर्वी मंजूर झालेल्या कामांना निधी न देता, पालकमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना डावलत, अलीकडेच मंजूर झालेल्या कामांना निधी दिल्याचे निमित्त त्याला मिळाले.

Just Now!
X