TVS Jupiter 110 Teaser Released: तुम्ही नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर थांबा.. कारण TVS आपली नवीन ज्युपिटर भारतात लाँच करणार आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी TVS मोटरने भारतीय दुचाकी उत्पादक TVS लवकरच एक नवीन स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. लाँचपूर्वी सोशल मीडियावर नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे.नवीन ज्युपिटर २२ ऑगस्ट रोजी लाँच होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. सध्या ही स्कूटर ११०cc आणि १२५cc इंजिनमध्ये उपलब्ध आहे.

TVS लवकरच भारतीय बाजारात नवीन स्कूटर लाँच करणार आहे. लाँचपूर्वी कंपनीने सोशल मीडियावर एक नवीन टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये स्कूटरशी संबंधित माहिती पाहता येईल.नवीन ज्युपिटरमध्ये आणखी काय खास आणि नवीन पाहायला मिळणार आहे, ते जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर रिलीज झालेल्या टीझरमध्ये स्कूटरचे नवीन एलईडी डीआरएल दाखवण्यात आले आहे. सोबत दिवे चालू केले आहेत असेही लिहिले आहे. नवीन स्कूटर लवकरच सादर करण्यात येणार आहे. याशिवाय २२ ऑगस्टच्या तारखेची माहितीही चार सेकंदांच्या व्हिडिओ टीझरमध्ये देण्यात आली आहे.

नवीन डिझाइन आणि फीचर्स

यावेळी नवीन ज्युपिटर 110 च्या डिझाईनमध्ये अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला त्याच्या फ्रंट लूकमध्ये एक नवीन एलईडी हेडलाइट पाहायला मिळणार आहे. याशिवाय स्कूटरच्या मागील लूकमध्ये नवीन एलईडी टेललाइट देखील दिसणार आहे. यामध्ये एक लांब आणि मऊ आसन दिसू शकते जे लांब अंतरावरही कंफर्ट वाटू शकते. या स्कूटरमध्ये एलसीडी डिस्प्ले असेल जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असेल. याशिवाय त्यामध्ये नेव्हिगेशनची सुविधाही मिळणार आहे.

पाहा टीझर

हेही वाचा >> नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० विरुद्ध जावा ३५०; कोणती मोटारसायकल आहे बेस्ट? काय आहेत खास वैशिष्ट्ये…

किंमत किती असेल ?

सध्या, ज्युपिटर 110 ची किंमत ७३ हजार रुपयांपासून सुरू होते, परंतु नवीन स्कूटरची किंमत ५००० रुपयांपर्यंत वाढू शकते असे मानले जात आहे.