मुंबई पेपरफुटी आणि विविध घोटाळ्यांमुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरू होत आहे. या भरती प्रक्रियेतून १० हजार ९४९ पदे भरण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS मार्फत राबविण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन उमेदवारांच्या भरतीसाठी टीसीएस अनेक सरकारी विभागांना मदत करीत आहे. याआधी कंपनीने रेल्वेसाठी भरती परीक्षा, SSC परीक्षा, तलाठी भरती प्रक्रियेत सरकारला मदत केली होती. २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य विभागात आयोजित केलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली. आता मंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागात पुन्हा एकदा मेगा भरती सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेत क आणि ड संवर्गातील विविध प्रकारच्या ६० पदांवर एकूण १० हजार ९४९ जणांची भरती होणार आहे.

हेही वाचाः Money Mantra : ३१ लाख जण अजूनही आयटी रिफंडसाठी पात्र नाहीत, पण का? तुमच्याकडूनही ही चूक झाली आहे का?

तसेच महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील घरोघरी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक ११५ सुरू करणार आहे, असे सावंत यांनी सांगितले. हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचाः भारतात यंदा गेल्या ८ वर्षांतील सर्वात कमी पाऊस पडण्याची भीती; साखर, डाळी अन् भाज्यांचे भाव वाढण्याची शक्यता

या हेल्पलाइन क्रमांकाचा हेतू नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा आहे. विशेषतः हेल्पलाइन क्रमांक ज्येष्ठ नागरिक, एकटे राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींसाठी आणि गंभीर क्षणी इतर रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा आहे, असंही ते म्हणालेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 thousand 949 posts will be recruited in the health department of the state through tcs vrd