नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर ‘इंटर्नशिप’ अर्थात प्रशिक्षणार्थी कार्यक्रम गुरुवारी सुरू केला, याअंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे १ कोटी तरुणांना वार्षिक ६०,००० रुपये आर्थिक साहाय्य प्रदान केले जाणार आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी या पथदर्शी प्रकल्पावर सुमारे ८०० कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. या वर्षात १.२५ लाख उमेदवारांना प्रशिक्षणार्थी कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाईल, असे सरकारी सूत्रांनी गुरुवारी सांगितले. जुलैमध्ये अर्थसंकल्पात या पंतप्रधान प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. योजनेअंतर्गत सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याला (इंटर्न) विमा संरक्षणदेखील प्रदान केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत प्रत्येक वैयक्तिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याला विमा संरक्षण असेल. या संदर्भातील विमा हप्ता केंद्र सरकार देणार आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने विकसित केलेल्या संकेतस्थळावरून या योजनेत सहभागी होता येईल.
पाच वर्षांत १ कोटी ‘इंटर्नशिप’ प्रदान करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट
केंद्र सरकारच्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत प्रत्येक वैयक्तिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याला विमा संरक्षण असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-10-2024 at 22:53 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government started internship program on pilot basis print eco news zws