Career Options : अनेकजण आपल्या करिअरला घेऊन खूप चिंतेत असतात, अशावेळी नातेवाईक आणि मित्रांच्या सांगण्यावरून एखाद्या कोर्समध्ये प्रवेश घेतात, पण यानंतर मोठी चिंता असते ती यात करिअर कसे करायची याची. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी असे काहीतरी करिअर निवडायला हवे ज्यामुळे ते नोकरीचा शोध घेणाऱ्या गर्दीचा भाग बनणार नाही आणि उत्तम पगारही मिळवू शकतील. म्हणून आम्ही तुम्हाला असेच काही ५ अजब-गजब कोर्सेस सांगणार आहोत जे थोडे वेगळे आहेत पण लाखोंचा पगार मिळवून देणारे आहेत. यापैकी एक कोर्सनंतर तुमची लाईफ सेट आहे असे समजा… हे कोर्सेस केवळ देशातच नाही तर परदेशात तुम्हाला मोठ्या करिअरची संधी मिळवून देतात. यामुळे तुमची करिअरची चिंता दूर होऊ शकते, जाणून घेऊ या कोर्सेस बद्दल…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कठपुतळी आर्ट डिग्री

प्रत्येकाने कधी ना कधी कठपुतळी नृत्य, म्हणजे पपेट शो पाहिले असतीलचं. पण कठपुतळी आर्टसाठीही अभ्यास करावा लागतो हे तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, अमेरिकेच्या कनेक्टिकट युनिव्हर्सिटीमध्ये यासाठी ३ वेगळे डिग्री कोर्स आहेत. यातील पहिला म्हणजे बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स म्हणजेच बीएफए, दुसरा मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजेच एमए आणि तिसरा मास्टर ऑफ फाइन आर्ट्स म्हणजेच एमएफए. मुंबई युनिव्हर्सिटीमध्येही कठपुतळी आर्टसाठी सर्टिफिकेट कोर्स आहे. तुम्ही पपेट आर्टला तुमचा छंद बनवू शकता. आजकाल परदेशात कठपुतळी आर्टिस्ट्सना चांगली मागणी आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही महिना लाखो रुपये कमवू शकता.

टर्फ ग्रास सायन्स कोर्स

यात डिग्री आणि सर्टिफिकेट दोन्ही प्रकारचे कोर्समध्ये आहेत. या कोर्सदरम्यान गवत वाढवण्याच्या पद्धती, त्याची निगा, व्यवसाय व्यवस्थापन याबाबत माहिती दिली जाते. अमेरिकेतील मेसाच्युसेट्स आणि पेंसिल्व्हेनियासारख्या युनिव्हर्सिटीमध्ये हे कोर्स उपलब्ध आहेत. याशिवाय देशातील काही खासगी युनिव्हर्सिमध्येही त्याचे सर्टिफिकेट कोर्सेस चालवले जातात. या अभ्यासानंतर तुम्ही गोल्फ कोर्स सुपरिटेंडंट, ग्राउंड्सकीपर आणि लँडस्केप डिझायनर बनू शकता. यातील पगाराबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला महिना लाखात पगार मिळतो. यासोबतच या कोर्समध्ये तुमचा अनुभव जसजसा वाढत जातो तसतसा तुमचा पगारही वाढतो.

व्हिटी कल्चर अँड एनालॉजी कोर्स

या कोर्समध्ये वाईन बनवण्याच्या पद्धती आणि त्याचे जतन कसे करायचे हे शिकवले जाते. हा कोर्स जगातील अनेक युनिव्हर्सिटीमध्ये शिकवला जातो. अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीत व्हिटी कल्चर हा सर्टिफिकेट कोर्स आहे. याशिवाय देशातील गार्गी अॅग्रीकल्चर रिसर्च अँड ट्रेनिंग इंस्टिट्यूट, नाशिक येथे वाईन टेक्नॉलॉजीमध्ये बी.एस्सी कोर्स उपलब्ध आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही ऑफ वाईन स्पेशालिस्ट बनून भरघोस पगार मिळवू शकता.

कंटेम्परेरी सर्कस अँड फिजिकल परफॉर्मेंस डिग्री

ब्रिटेनमधील बाथ स्पा युनिव्हर्सिटी इस (कंटेम्पररी सर्कस अँड फिजिकल परफॉर्मन्स) नावाचा (बीए ऑनर्स) डिग्री कोर्स देखील आहे. या कोर्समध्ये सर्कस स्किलसह फिजिकल थिएटर, परफॉर्मेंस स्किल आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन दिले जाते.

इंटरनॅशनल स्पा मॅनेजमेंट कोर्स

हा कोर्स ब्रिटनच्या डर्बी युनिव्हर्सिटीमध्ये शिकवला जातो. या कोर्समध्ये स्पा म्हणजे काय, स्पा बिजनेस मॅनेजमेंट, यासोबत यातील डाइट आणि एक्सरसाइज कशा करायच्या याच्या पद्धती शिकवल्या जातात. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही स्पा मॅनेजर बनू शकता. स्पा मॅनेजरला आपल्या देशात लाखोंचे पॅकेज मिळते. तसेच परदेशात या कोर्सला खूप मागणी आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career tips these 5 amazing courses in world to earn 1 lakh in month read more details sjr