गेल्या अंकात म्हटल्याप्रमाणे कुंडय़ांमध्ये माती कशी आणि किती टाकायची हे आपण पाहिलं. आता पाहू सूर्यप्रकाशाची आवश्यकता. त्याकरिता प्रत्येक कुंडीला ऊन मिळेल अशी रचना करावी. गॅलरीत आडोशाच्या वस्तू नसाव्यात. मोठय़ा कुंडय़ा एका ओळीत किंवा लागून असतील तर त्याच्या कोपऱ्याच्या आधारावर छोटय़ा कुंडय़ा ठेवाव्यात. अनुभवातून करता येईल. मात्र सूर्यप्रकाश रोपांच्या वाढीसाठी अत्यावश्यक घटक आहे हे ध्यानात ठेवावे.
सूर्यप्रकाशाप्रमाणे पाणीही महत्त्वाचे. पाणी हे झाडांचे अन्न असते. साहजिकच पुरेसे पाणी त्यांना लागतेच. मात्र फळझाडे, फुलझाडे आणि नाजूक भाज्यांना उन्हाळ्यात रोपांना दोनदा पाणी द्यावे, मात्र बेताने द्यावे. हिवाळ्यात एकदाच पाणी द्यावे. पावसाळयात घरात वा कुंडय़ांत पाणी येत असेल तर ते पाणी काढून टाकावे किंवा सुरुवातीला माती भरताना प्रत्येक कुंडीला पाण्याचा निचरा होणारे साधन पाहून त्यावर दगड, चिपा ठेवून मगच माती भरावी? म्हणजे पाणी आपोआप निघून जाते. दिल्ली, अमेरिकेसारख्या ठिकाणी हिवाळयात अति थंडीमुळे रोपांची वाट लागू शकते. त्या ठिकाणी व्यवसायात हिटिंगची सोय करतात. साधारणपणे नाजूक, महत्त्वाची किंवा आवडीची रोपे काही काळ घरात ठेवावीत. फळभाजीच्या झाडाच्या मुळांना उघडे पडू देऊ  नये.       
तारा माहूरकर – tara@mahurkars.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need of sunlight and weather