Murder in Bihar : बिहारच्या नवादा येथे एक भीषण घटना घडला आहे. एका मुलाची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. या मुलावर जवळपास ३० वेळा वार करण्यात आले. परंतु, तरीही त्याला वाचवण्याकरता एकाही पादचाऱ्याने पुढाकार घेतला आहे. परिणामी या मुलाचा मृत्यूचा झाला. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिहारमधील नवादा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. व्हिडिओमध्ये पीडितेवर चाकूने वार करत असलेल्या आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वृत्तानुसार पीडित महिला कॉन्स्टेबलचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी पीडितेला चाकूने बेदम मारत असताना त्यांच्या बाजूने कार, बाईक आणि बस धावत आहेत. परंतु, एकानेही हा हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, असं या व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. एवढंच नव्हे तर एक माणूस या घटनेकडे शांतपणे पाहतानाही दिसतोय.

वर्दळीच्या रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या उदासिनतेमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने बिहार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नक्कीच गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बिहारमध्ये एका महिन्याच्या कालावधीत अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. २ डिसेंबर रोजी बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एका बिहार सरकारी शाळेतील शिक्षकाचे अपहरण करण्यात आले आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्यात आले. २९ नोव्हेंबर रोजी फुलकोबी चोरल्याप्रकरणी ५० वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली होती. त्याच दिवशी स्कूल व्हॅन चालकाने दोन नर्सरीच्या विद्यार्थ्यांना घरी सोडत असताना त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना बेगुसराय येथे घडली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar crime woman constables son dies after being stabbed in broad daylight over 30 times in nawada horrific visuals surface sgk