करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. जगभरात सुमारे दीड लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून याबाबत जनजागृती केली जात आहे. या दरम्यान, एक अतिशय भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टेशनपासून जिमपर्यंत सगळे ‘मास्क’मॅन… मुंबईकरांनी घेतला #CoronaVirus चा धसका

करोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याने जगभरात एकच खळबळ माजली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना प्रचंड प्रमाणात काम करावे लागत आहे. चीन आणि इटलीमधील वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना तर २४ तासांच्या शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत घरी जाणं तर दूरच राहिलं. याचदरम्यान चीनमधील हेबई भागातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक नर्स सुमारे महिन्याभराने घरी परतली असता तिच्या मुलाची काय प्रतिक्रीया आहे याबाबतचा हा व्हिडीओ आहे.

CoronaVirus : “दुसऱ्या देशांकडून थोडं शिका’; ‘बर्थ डे गर्ल’ सायनाचा चाहत्यांना सल्ला

चीनमधून करोना व्हायरसला सुरूवात झाली. चीनच्या हेबई प्रांतात या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रचंड काम करावे लागले. एक नर्स तब्बल महिन्याभराने घरी परतली. एका बसमधून या साऱ्यांना घेऊन येण्यात आले. गर्दीत आपल्या आईला पाहून मुलाच्या भावना अनावर झाल्या आणि तो थेट आईला बिलगला.

व्हिडीओ –

CoronaVirus : रोहित शर्माने पोस्ट केला खास VIDEO, म्हणाला…

मुलाची आई गर्दीत उभी होती. मुलगा रडत-रडत धावत गेला आणि त्याने थेट आपल्या आईच्या दिशेने झेप घेतली. आपल्या मुलाच्या मिठीमुळे आईलाही अश्रू अनावर झाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याच्या आईने सांगितले की २९ दिवस त्या घरी आल्या नव्हत्या. त्यामुळे मुलाला भेटून भावना अनावर झाल्याचेही नर्सने सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus viral video boy embraces mother nurse after her return from hospital in china watch vjb