करोना साथीचा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अहवालात समोर आला आहे. ICMR ने केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कामाचे तास आणि तीव्रता, लोकांचे गैरवर्तन आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या असलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्या ज्यात त्यांना नवीन प्रोटोकॉलशी जुळवून घ्यावे लागले. या सर्वांचा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर मानसिक परिणाम झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतात, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांविरुद्ध देशाच्या अनेक भागांमध्ये हिंसाचाराची नोंद झाली, ज्यामुळे डॉक्टर आणि परिचारिकांना कामाची ठिकाणे सोडावी लागली, असे अभ्यासात म्हटले आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तणाव, चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, असे अभ्यासात म्हटले आहे.

कुटुंबाला संसर्ग होण्याची भीती

ICMR च्या अभ्यास आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्य संस्कृतीत मोठ्या बदलांमुळे उद्भवलेल्या आव्हानांकडे लक्ष देण्यात आले. अनेक आरोग्य कर्मचारी या बदलासाठी तयार नव्हते डॉक्टर आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनाच अनिश्चित काळासाठी काम केल्यामुळे झोपेच्या समस्येला सामोरे जावे लागले. यासोबतच त्यांची खाण्याची सवयही बिघडली. साथीच्या रोगामुळे निर्माण झालेल्या कामाच्या दबावामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेवर जेवण मिळत नव्हते. अभ्यासात असे म्हटले आहे की, कुटुंबापासून दीर्घकाळ वेगळे राहण्यामुळे आणि करोना रुग्णांच्या सेवेच्या काळजीमध्ये गुंतल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना कुटुंबाला करोनाची होण्याची भीती ही स्वतः संक्रमित होण्याच्या भीतीपेक्षा जास्त होती.

हा अभ्यास भुवनेश्वर (ओडिशा), मुंबई (महाराष्ट्र), अहमदाबाद (गुजरात), नोएडा (उत्तर प्रदेश), दक्षिण दिल्ली, पठाणमथिट्टा (केरळ), कासारगोड (केरळ), चेन्नई (तामिळनाडू), जबलपूर (मध्य प्रदेश), कामरूप (आसाम) आणि पूर्व खासी हिल्स (मेघालय) मध्ये ९६७ पेक्षा जास्त जणांवर केला गेला. यापैकी ५४ टक्के महिला आणि ४६ टक्के पुरुष होते. अभ्यासात सहभागी झालेले प्रामुख्याने २० ते ४० वयोगटातील लोक होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid epidemic affects the mental health of health workers conclusion of icmr study srk