‘सिमी’च्या दोन अतिरेक्यांनी गोळीबारात तीन पोलिसांची हत्या केल्याच्या घटनेला आठवडा उलटत असतानाच न्यायालयात नेले जात असताना कैदेतील ‘सिमी’च्या अतिरेक्यांनी पोलिसांची शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर उडालेल्या चकमकीत पाच अतिरेकी ठार झाले. ठार झालेल्यातील वकारुद्दीन अहमद ऊर्फ वकार याने २००८मध्ये दोन पोलिसांची हत्या केली होती तसेच वारंगळ पोलिसांमध्ये दहशत पसरवली होती. तेहरिक गालिबा ए इस्लाम या स्थानिक गटाचा तो संस्थापक होता.
वारंगळचे पोलीस महानिरीक्षक व्ही. नवीन चांद यांनी सांगितले की, या पाचही जणांचा अनेक दहशतवादी कारवायांत हात होता. २०१०मध्ये त्यांना राज्याच्या विविध भागांतून अटक झाली होती. वारंगळ मध्यवर्ती तुरुंगातून हैदराबाद न्यायालयात त्यांना नेले जात असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास हैदराबादहून १०० किमी अंतरावर वारंगळ जिल्ह्य़ातील जानगाव येथे नैसर्गिक विधीसाठी या अतिरेक्यांनी गाडी थांबविण्याची विनंती केली. पोलिसांनी त्यांच्या हातातील बेडय़ा काढल्यानंतर वकारने पोलिसांकडील शस्त्रास्त्रे हिसकावल्यानंतर ही चकमक उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five suspected simi terrorists killed in telangana