ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या वैधतेवर वाराणसी न्यायालय आज निर्णय देणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेली ही मशीद अनेक दशकांपासून जुन्या कायदेशीर वादांच्या केंद्रस्थानी आहे. मागील वर्षी पाच महिला याचिकाकर्त्यांनी मशिदीच्या बाहेरील भितींवर आणि इतर जुन्या मंदिराच्या परिसरात दिसणाऱ्या आणि अदृश्य देवतांच्या समोर दैनंदिन प्रार्थना करण्याची परवानगी मागिल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. हा परिसर आता वर्षातून एकदा हिंदू भाविकांना प्रार्थना करण्यासाठी खुला आहे.

वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात मुख्य प्रकरणाची सुनावणी सुरू असताना, जलदगती न्यायालय या मुद्य्यावर वेगळ्या याचिकेवर सुनावणी करत आहे.

मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या वैधतेवर आज निर्णय देणार असल्याचे जलगती न्यायालयाने यापूर्वी सांगितले होते. याशिवाय विश्व वैदिक सनातन संघाच्या याचिकेतही हा परिसर हिंदूंच्या ताब्यात द्यावा आणि आत सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

नवापी मशिदीमध्ये सापडलेल्या ‘शिवलिंगा’चा काळ कार्बन डेटिंग पद्धतीने शोधण्याची मागणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने गेल्या महिन्यात फेटाळली होती. चार हिंदू महिलांनी ही याचिका दाखल केली होती. मशिदीच्या भिंतीनजीक असलेल्या हिंदू देवतांच्या मूर्त्यांची तसेच शृंगारदेवी मंदिरात दररोज पूजा करण्याची परवानगी द्यावी, यासाठी हिंदू पक्षाकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणात मशिदीच्या वझुखान्याजवळ सापडलेली वस्तू प्राचीन शिवलिंग असल्याचा हिंदू पक्षकारांचा दावा असून हे केवळ कारंजे असल्याचे मशीद व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gyanvapi case hearing today on the petition seeking ban on entry of muslims in the premises of gyanvapi masjid msr