ICAI IPC CA Result 2018: द इन्सिट्टयूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटटस ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाऊंटट इंटरमिजिएट (जुना आणि नवा अभ्यासक्रम) परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार) जाहीर केला आहे. जुन्या अभ्यासक्रमात अर्जुन मिनोचा याने ७४.१४% टक्क्यांसह तर नवीन अभ्यासक्रमात दिल्लीचा शुभम मल्होत्रा हा पहिल्या क्रमांकाने ८२.१३% उत्तीर्ण झाला आहे. या निकालाबरोबर संस्थेने गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ICAI IPC चा निकाल खालील वेबसाइटवर उपलब्ध आहे- icaiexam.icai.org, caresults.icai.org and icai.nic.in. देशभरातून १.५७ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नोव्हेंबर महिन्यात ही परीक्षा झाली होती.
जुन्या अभ्यासक्रमात अर्जुन मिनोचा याने ७०० पैकी ५१९ गुणांसह (७४.१४%)प्रथम क्रमांक पटकावला आहे. पंजाबच्या दिव्या गुप्ता ७१.४३ टक्क्यांसह द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर नवी दिल्लीचा परमांशु शर्मा ७० टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तर नवीन अभ्यासक्रमात दिल्लीचा शुभम मल्होत्रा हा पहिल्या क्रमांकाने (८२.१३%) उत्तीर्ण झाला आहे. द्वितीय क्रमांक कोलकाताचा प्रन्शू बागरोडिया (८१.१३%), हरयाणातील सिरसाच्या पुष्प गोयल तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.