जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. दक्षिण काश्मीरच्या दरमदोरा परिसरात आज सकाळपासून चकमक सुरू असून यामध्ये चार दहशतवादी ठार झाले आहेत, अद्यापही सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरूच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोपियानमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली होती. लपलेल्या दहशतवाद्याने सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाने गोळीबार केला. यावेळी झालेल्या गोळीबारात 4 दहशतवादी ठार झाले तर परिसरात अद्याप शोधमोहीम सुरू आहे. काश्मीरमध्य शुक्रवारपासून सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक पाहायला मिळत आहे. शनिवारी बारामुला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ‘जैश ए मोहम्मद’चा दहशतवादी ठार झाला होता त्यानंतर आज पुन्हा एकदा चार दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu kashmir shopian encounter terrorists killed sas