उत्तराखंड या पर्वतीय राज्यातील लोकसभेच्या पाचपैकी ३ जागा भाजपने जिंकल्या असून, इतर २ मतदारसंघात आघाडी घेतली आहे. यामुळे या पक्षाच्या २०१४च्या निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नैनिताल- उधमसिंह नगर मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी काँग्रेसचे सरचिटणीस व माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा ३ लाख ३९ ०९६ मतांनी पराभव केला. भट्ट यांचे मताधिक्य उत्तराखंडमध्ये भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये सर्वात जास्त आहे.

हरिद्वार मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी काँग्रेसचे अंबरिश कुमार यांचा २५८७२९ मताधिक्याने पराभव केला. निशंक यांना ६६५६७४, तर अंबरिश यांना ४०६९४५ मते मिळाली.

गढवाल मतदारसंघात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तीरथसिंह रावत यांनी त्यांचे काँग्रेसचे प्रतिस्पर्धी आणि पौडी गढवालचे भाजपचे विद्यमान खासदार भुवनचंद्र खंडुरी यांचे पुत्र मनीष खंडुरी यांना ३०२६६९ मतांनी पराभूत केले.

केंद्रीय राज्यमंत्री अजय टम्टा यांनी अल्मोडा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार प्रदीप टम्टा यांचा पराभव केला. तेहरी गढवालच्या भाजपच्या विद्यमान खासदार माला राज्यलक्ष्मी शहा यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांचा पराभव केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2019 results analysis