मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटकपक्ष्याचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांनी पदयात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करून आल्यानंतर नवनगर विकास प्राधिकरण इमारतीच्या मुख्य गेट समोर शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना विरोधी उमेदवार पार्थ अजित पवार यांनी स्वतः बारणे यांची भेट घेत हस्तांदोलन केले. यावेळी दोघांनी एकमेंकाना ऑल दी बेस्ट म्हणत शुभेच्छा दिल्या. तसेच पार्थ यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना देखील हस्तांदोलन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी देहू येथे तुकारामबीज निमित्त पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे एकत्र आल्याचे दिसले होते. त्यावेळी बारणे यांनी स्वतःपार्थ पवार यांच्याशी बातचीत करत हस्तांदोलन केले होते.

शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे आणि गिरीश बापट यांनी उपस्थिती दर्शवली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election 2019 parth pawar and srirang shakehands each other