सध्या स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा चालू असताना मायक्रोमॅक्स कंपनीने एक नवीन स्मार्टफोन बाजारात दाखल केला आहे. ‘वाय यू युरेका’ असे या फोनचे नाव असून, हा फोन काही दिवसात उपलब्ध होणार आहे. सध्या केवळ काळ्या रंगात असलेला हा फोन ६ जूनला रात्री १२ वाजल्यानंतर ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा फोन ग्लॉसी ब्लॅक आणि मॅट ब्लॅक रंगात उपलब्ध होणार आहे. याशिवाय ५ इंचाची एच.डी.स्क्रीन आणि २.५ डी गोरिला ग्लास देण्यात आली आहे. यामध्ये ऑक्टाकोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३० हा प्रोसेसर वापरण्यात आला आहे. ४ जीबी रॅम असणाऱ्या या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी ३२ जीबी आहे. तर एसडी कार्डच्या माध्यमातून ही मेमरी १२८ जीबीपर्यंत वाढवता येणार आहे. याबरोबरच फोनला ३००० मिलीअॅम्पिअर्सची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे फोन एक दिवस पूर्ण वापरता येऊ शकतो.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इतक्या सुविधा असणारा हा फोन ग्राहकांना केवळ ८९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. या फोनची झायोमी रेडमी ४, झायोमी रेडमी नोट ४ आणि नुबिया एन वन लाईट यांच्याशी स्पर्धा आहे. याचा कॅमेराही अतिशय चांगला असून, १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कमी प्रकाशातही चांगले फोटो काढता यावेत यासाठी दोन्ही बाजूंनी फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधा देण्यात आली आहे. वाय यू सीरिजमध्ये २०१४ पासून आतापर्यंत ९ स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Micromax launches yu yureka black smartphone with 4 gb ram for rs