नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमानअपघातग्रस्त झाल्याची बातमी समोर येत आहे. सध्या याठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. येती एअरलाईन्स एअरक्राफ्ट या कंपनीचे हे विमान पोखराच्या आंतरराष्ट्रीय विमातळावर अपघातग्रस्त झाले, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. बचाव कार्य करत असताना आतापर्यंत ३६ मृतदेह मिळाले आहेत. यापैकी पाच भारतीय नागरिक असल्याची माहिती मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना बचाव कार्यात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

विमानात पाच भारतीय नागरिक

या विमानातील एकूण प्रवाशांपैकी पाच भारतीय नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. चार रशियन, एक आयरलँड, कोरियाचे दोन, अर्जेंटिना आणि फ्रांसचा एक-एक नागरिक होता. नेपाळच्या विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ६८ प्रवाशांपैकी सहा लहान मुलांचाही समावेश होता.

विश्लेषण : नेपाळमध्ये हवाई वाहतूक धोकादायक का आहे?

येती एअरलाईन्स एअरक्राफ्टचे (Yeti airlines aircraft) प्रवक्ते सुदर्शन बार्तोला यांनी सांगितले की, या विमानत ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. काठमांडू वरुन पोखरा येथे हे विमान आले होते. मात्र जुन्या विमातळावर दुर्दैवाने अपघात झाला. याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. आज तक या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे विमातळाजवळ असलेल्या डोंगराला धडकून या विमानाचा अपघात झाला असावा. डोंगराला धडक दिल्यानंतर विमान समोर असलेल्या नदी किनारी आदळले. तिथेच या विमानाचा अपघात झाला. अपघातस्थळी बराच वेळ फक्त धुराचे लोळ दिसत होते.

PHOTOS : लँडिंगच्या अवघ्या काही सेकंद अगोदर काळाची झडप; भीषण विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह ७२ जणांचा मृत्यू

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plane crashed at pokhara airport in nepal kvg