पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी ट्विटरवरून भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याचा गौरव केला. देशभरात आज कलाम यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  मोदींनी गुरूवारी संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या (डीआरडीओ) मुख्यालयात कलाम यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केले. संशोधक, विद्वान आणि राष्ट्रपती म्हणून त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याला मी सलाम करतो. शिक्षण आणि अध्यापनाविषयीची त्यांची निष्ठा नेहमीच आमच्या स्मरणात राहील. त्यांच्यामुळे देशातील अनेक तरूणांना विचार करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यासाठी प्रेरणा मिळाली. डॉ. कलाम आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, आदर्श आणि देशासाठीची दुरदृष्टी नेहमी आपल्याबरोबर राहील, असे मोदी यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचा जन्मदिवस म्हणजे १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजर करण्यात येणार आहे. यासाठी शाळा शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच जोडीला आता ऑनलाइन विश्वकोश ही बिरुदावली मिरवणारा विकिपीडियाही या उपक्रमात सहभागी झाली आहे. या संकेतस्थळाच्या मराठी विभागाने केवळ एकच दिवस नव्हे तर पूर्ण एक आठवडा वाचनासाठी देण्याचे ठरविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तो प्रवास सुंदर होता.. 
विज्ञानेश्वराचे प्रस्थान 
माझी स्वप्ने, माझे सुख.. 
‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’वर विश्वास नाही! – डॉ. कलाम 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi unveils abdul kalam bust on former president 84th birth anniversary