गेल्या शतकभरात सागरी जलपातळी गेल्या २७ शतकांपेक्षा जास्त वेगाने वाढली असून ते प्रमाण १४ सेंटिमीटर आहे. जागतिक तापमानवाढीमुळे ही सागरीपातळी वाढली असून ते धोकादायक आहे, असे संशोधन अहवालात म्हटले आहे. सागरी जलाची पातळी इ. स. १९०० ते इ. स. २००० या काळात १४ सेंटिमीटर किंवा ५.५ इंचांनी वाढली आहे. जागतिक तापमानवाढ झाली नसती तर हे प्रमाण विसाव्या शतकात सागरी जलपातळी वाढीतील प्रमाण निम्म्याहून कमी राहिले असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रूटगर्सच्या पृथ्वी व ग्रहीय विज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक रॉबर्ट कॉप यांनी सांगितले की, विसाव्या शतकात सागरी जलपातळीत फार मोठी वाढ झाली आहे, ती तीन सहस्रकांपेक्षा जास्त आहे.

गेल्या दोन दशकात सागरी जलपातळीतील वाढ सर्वाधिक नोंदली गेली आहे.  प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या अडीच वर्षांत सागरी जलपातळी मोजण्याची सांख्यिकी पद्धत तयार करण्यात आली ती हार्वर्ड विद्यापीठाचे कार्लिग हे, एरिक मॉरो व जेरी मिट्रोव्हिका यांनी विकसित केली आहे. स्थानिक पातळीवर जलपातळी मोजण्याची कुठलीही सुविधा नाही. विशिष्ट ठिकाणी सागरी जलपातळी मोजण्यासाठी विविध पद्धती वापरल्याने त्यांची सरासरीही वेगळी येत होती. सांख्यिकीय अडचणी अनेक होत्या. त्यामुळे जागतिक पातळीवर असे मापन करणे अवघड होते. त्यामुळे नवी पद्धत विकसित करावी लागली. या संशोधनानुसार पृथ्वीचे तापमान ०.२ अंश सेल्सियसने कमी होते तेव्हा इ. स. १००० ते इ. स. १४०० दरम्यान आठ सेंटिमीटर म्हणजे तीन सेंटिमीटरने सागरी जलपातळी कमी झाली होती. सागरी जलपातळीचा संबंध पृथ्वीच्या कमी-जास्त होणाऱ्या तापमानाशी निगडित असतो, पण अलीकडच्या काळात पृथ्वीचे तापमान कमी झाले नसून ते वाढतच चालले आहे. १९ व्या शतकाशी तुलना केली तर पृथ्वीचे तापमान तेव्हाच्या पेक्षा १ अंश सेल्सियसने अधिक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sea level rise than last 100 years