शोभा डे आणि वाद हे समीकरण आपल्या देशाला काहीही नवं नाही. आता ट्विटरवर सध्या शोभा डे आणि अब्दुल बसित हे ट्रेंड होत आहेत. त्यावरुन हे समोर आलं आहे की पाकिस्तानच्या उच्चायुक्तपदी राहिलेले अब्दुल बासित यांनी एक खळबळजनक खुलासा केला. तो खुलासा हाच आहे की शोभा डे यांनी पाकिस्तानच्या सांगण्यावरुन सरकारविरोधी लेख लिहिला होता. अब्दुल बासित यांनीच हा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहशतवादी बुऱ्हान वाणीला ठार करण्यात आलं, त्यानंतर पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी शोभा डे यांच्यासह इतर काही पत्रकारांची भेट घेतली होती. शोभा डे भारताविरोधात लेख लिहिण्यास तयार झाल्या. काश्मीरमधली परिस्थिती, बुऱ्हान वाणीचा मृत्यू या सगळ्याबाबत पाकिस्तान सरकारच्या इशाऱ्यावरुन शोभा डे यांनी एक लिहिला होता असा खुलासा आता अब्दुल बासित यांनी केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे वास्तव समोर आणले आहे.opindia ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

हा पाहा व्हिडिओ

‘Burhan Wani is dead but he’ll live on till we find out what Kashmir really wants’ हा मथळा असलेला लेख शोभा डे यांनी पाकिस्तानच्या इशाऱ्यावरुन लिहिला होता असा दावा अब्दुल बासित यांनी केला आहे. यामुळे आता शोभा डे यांच्याविरोधात नवा वाद निर्माण होणार यात शंकाच नाही. दरम्यान नेटकरी शोभा डे आणि अब्दुल बासित या दोघांनीही चांगलेच ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर आलेल्या माहितीनुसार या दोघांनाही मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं आहे.

मी भारतातल्या काही पत्रकारांना भेटलो मात्र त्यांनी काश्मीरबाबत लेख लिहिण्यास नकार दिला. त्याच दरम्यान माझी भेट शोभा डे यांच्याशी झाली. त्या मला खूपच नम्र वाटल्या. मग मी त्यांना काश्मीर प्रश्नावर एक लेख लिहिण्याची विनंती केली जी त्यांनी मान्य केली. पाकिस्तान सरकारच्या इशाऱ्यावर शोभा डे यांनी लेख लिहिला असं आता अब्दुल बासित यांनी सांगितलं आहे. आता अब्दुल बासित यांनी हे सांगितल्यामुळे सोशल मीडियावर शोभा डे यांच्या विरोधात टीकेचा भडीमार सुरु झाला आहे.

याआधी मागच्याच आठवड्यात शोभा डे यांनी कलम ३७० रद्द करण्याचा जो निर्णय झाला होता त्यावरुन एक ट्विट करुन सरकारची खिल्ली उडवली होती.  अमित शाह तुम्ही  काश्मीर प्रश्न सोडवलात आता मुंबईतील साकीनाका येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचाही प्रश्न सोडवा असा उपरोधिक ट्विट त्यांनी केला होता. आता मात्र देशविरोधी लिखाण पाकिस्तानच्या इशाऱ्यावरुन केल्याची बाब समोर आली आहे. सगळ्या सोशल मीडियात ही बातमी पसरली असून आता शोभा डे आणि अब्दुल बासित या दोघांवरही टीकेचा भडीमार होतो आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shobha day wrote article under influance of pakistan says abdul basit scj