आत्मघाती हल्लेखोराने शियांच्या मशिदीमध्ये घडवलेल्या स्फोटामध्ये ३९ जण ठार झाले. यामध्ये अनेक जण जखमी झाले. स्वत:ला उडवून देण्याच्या प्रयत्नात असताना स्थानिकांनी दुसऱ्या हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले.
उत्तर बगदादमध्ये संध्याकाळी प्रार्थनेनंतर आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिले. यामध्ये घटनास्थळी ३० जणांचा मृत्यू झाला तर ५५ जण जखमी झाले. स्फोट इतका मोठा होती की आसपासची अनेक दुकाने भस्मसात झाली. राजधानी बगदादमध्ये हल्ल्याच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने व्यापक सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. वाहनांद्वारे स्फोट रोखण्यासाठी वाहतुकीवर मोठय़ा प्रमाणात र्निबध लादण्यात आले आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-09-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide bomb targeting shiite mosque attacks kill at least 39 in iraq